टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

Feb 07,2024


आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय. याशिवाय क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये तो नंबर वन बनलाय.


पण बुमराहकडे नंबर वनचा ताज काही दिवसच राहाण्याची शक्यता आहे. कारण तिसऱ्या कसोटीसाठी वेगळाच प्लान ठरवला जात आहे.


भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होतोय. या सामन्यातून जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.


पण इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या जसप्रीत बुमराहला ऐन मालिकेतून ब्रेक का दिला जातोय, असा प्रश्न विचारला जातोय.


आयसीसी कसोटी क्रमवारीत आर अश्विन नंबर वनवर होता. तिसऱ्या कसोटीत बुमराहला विश्रांती दिल्यास, अश्विनकडे पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.


चांगल्या फॉर्ममध्ये असताना बुमराहला ब्रेक देणं टीम इंडियाला परवडणारं नाही. बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story