वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला 2 विकेटने पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव ठरला
रोहित शर्मा णि विराट कोहली या दिग्गजांना या मालिकेत विश्रांती देण्या आली आहे. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात युवा खेळाडू सपशेल फ्लॉप ठरताना दिसत आहेत.
युवा खेळाडूंमध्येही विशेषत: शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. गिल आणि संजूने प्रत्येकी 7 धावा केल्या. तर सूर्या 1 धाव काढून रनआऊट झाला.
वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही गिल, सूर्या आणि संजू हे त्रिकूट मोठी कामगिरी करु शकले नव्हते. भारताला या सामन्यात चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
भारतीय खेळपट्ट्यांवर या तिघांची कामगिरी दमदार असते. पण परदेशात या तिघांच्याही बॅटमधून धावांचा ओघ आटतो. विशेषत: एकदिवसीय सामन्यात ते तिघंही फ्लॉप ठरत आहेत.
वेस्टइंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमारने 78 धावा, संजूने दोन सामन्यात 60 तर गिलने तीन सामन्यात 126 धावा केल्या होत्या.
पहिल्या दोन टी20 सामन्यातही तिघं फ्लॉप ठरले आहेत. पहिल्या दोन सामन्यात सूर्या 22, आणि संजू सॅमसनच्या नावावर 19 धावा जमा आहेत.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात धावांची बरसात करणारा शुभमन गिल विंडिज दौऱ्यात खास कमाल करु शकलेला नाही. दोन कसोटी त्याने केवळ 45 धावा केल्या होत्या.
सूर्याने आतापर्यंत खेळलेल्या 10 एकदिवसीय सामन्यात 153, गिल 12 सामन्यात 704 आणि संजू सॅमसने 3 सामन्यात 118 धावा केल्या आहेत.
भारतीय खेळपट्टीवर खेळलेल्या टी20 सामन्यात त्यांची कामगिरी दमदार आहे. सूर्या 21 टी20 सामन्यात 760 धावा, गिल 6 सामने 202, संजू 5 सामने 68 धावा केल्या आहेत.