न्यूझीलंडचा फलंदाज जेफ अलोटच्या नावावर सर्वात धीम्या खेळीची नोंद आहे. अलोट 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात 101 मिनिंट खेळपट्टीवर उभा राहिला. 77 चेंडूत त्याने एकही धाव केली नाही.
भारताच्या मंसूर अली खान पटौदी यांनी 1972 मध्ये इंग्लंडविरुद्ध 102 मिनिटाची खेळी केली. यात त्यांनी 82 चेंडुंचा सामना केला आणि धावा केल्या होत्या केवळ 5.
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 77 चेंडुत 6 धावा केल्या होत्या. तो तब्बल 137 मिनिच मैदानानावर होता.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेनियम मार्टिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 धावा केल्या होत्या. यासाठी त्याने 59 चेंडूचा सामना केला आणि 106 मिनिटं घेतली
जेफ मिलर यांनी 1978 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 123 मिनिटं खेळपट्टीवर टीकाव धरला. यात त्यांनी 101 चेंडुंचा सामना केला आणि 7 धावा केल्या.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू राजेश चौहानने 1994 मध्ये श्रीलंकाविरुद्ध 96 चेंडूंचा सामना केला. यात त्याने केवळ 96 धावा केल्या होत्या.
गॉडफ्रे इवान्स यांनी 1947 साली सर्वात धीमी फलंदाजी केली होती. इंग्लंडच्या या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 133 मिनिटं फलंदाजी केली, आणि 96 चेंडूत 10 धावा केल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये धीमी फलंदाजी करण्यात राहुल द्रवीडचंही नाव जोडलं आहे. 2007 मध्ये द्रविडने तब्बल 140 मिनिटं फलंदाजी केली. यात 96 चेंडूत त्याने 12 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडचा माजी फलंदाज डॅनी मॉरिसनने 1996 मध्ये 136 चेंडूत केवळ 14 धावा केल्या. यासाठी त्याने 165 मिनिटांचा वेळ घेतला.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाच वॅन डर डुसेनने 2020 मध्ये 140 चेंडुंचा सामना केला. यात त्याने केवळ 17 धावा केल्या. यासाठी त्यने 194 मिनिटं घेतली.