साराला विसरला शुभमन, आता 'या' अभिनेत्री सोबत Photo Viral, फॅन्स म्हणाले....


भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल हा त्याच्या क्रिकेटमधील परफॉर्मन्स सह वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चर्चेत असतो.


क्रिकेटर शुभमन गिलचे नाव यापूर्वी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि अभिनेत्री सारा अली खान सोबत जोडले गेले होते. मात्र शुभमन गिलने त्याच्या रिलेशनशिपबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. सारा नंतर आता शुभमन गिल अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे.


शुभमन गिल आणि अनन्या पांडे हे दोघे एकत्र Beats Electronics या कंपनीच्या जाहिरातीत दिसत आहेत. Beats Electronics ही अमेरिकन कंपनी असून ती ऑडिओ प्रॉडक्ट बनवते.


Beats Electronics या कंपनीने स्वतःचे प्रॉडक्ट भारतात लाँच केले असून त्यांनी क्रिकेटर शुभमन गिल आणि अभिनेत्री अनन्या पांडे या दोघांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडले आहे.


शुभमन गिल आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांनी Beats Electronics या कंपंनीचे हेडफोन आणि इअरफोन घालून एकत्र फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे आता काही फॅन्स शुभमन गिलला ट्रोल करत आहेत.


शुभमन गिल याने अद्याप सारा सोबत आपल्या रिलेशनशिपबाबत खुलासा केलेला नाही मात्र दोघेही बऱ्याचदा एकत्र दिसतात. तर अभिनेत्री अनन्या पांडे हिचे सुद्धा अभिनेता आदित्य राॅय कपूर सोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहे.


शुभमन आणि अनन्या पांडेचा एकत्र फोटो पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने म्हंटले की, "आता सारा तेंडुलकरचं काय होईल?" तर एकाने लिहिले, " साराला न्याय मिळाला पाहिजे".


युवा क्रिकेटर रियान परागबाबत अशी अफवा आहे की अनन्या पांडे त्याची क्रश आहे. तेव्हा शुभमन आणि अनन्याचा हा फोटो पाहून एका नेटकाऱ्याने लिहिले की, "दुश्मन न करे दोस्तने वो काम किया है!" .


शुभमन गिल हा लवकरच दुलीप ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. शुभमन गिलकडे टीम अ चे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 5 सप्टेंबर पासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story