चेन्नई सुपरकिंग्सचा आयपीएल 2025 मधील परफॉर्मन्स चांगला ठरला नाही.
12 पैकी 9 सामन्यात पराभूत झालेली चेन्नई सुपरकिंग्स आयपीएलच्या 18 व्या सीजनमधून जवळपास बाहेर पडली आहे. त्यांचे केवळ २ सामने शिल्लक असून हे सामने त्यांच्या कामगिरीवर जास्त प्रभाव पाडू शकणार नाहीत.
आर अश्विन याला चेन्नईने ऑक्शनमधून तब्बल 9.75 कोटींना करारबद्ध केलं. मात्र या सीजनमधील 8 सामन्यात अश्विन केवळ 5 विकेट घेऊ शकला. त्यामुळे काही सामन्यात त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली नाही. तेव्हा कदाचित आयपीएल 2025 नंतर सीएसके अश्विनला रिलीज करेल.
राहुल त्रिपाठी याला चेन्नईने ऑक्शनमधून 3.40 कोटींना करारबद्ध केलं होतं. मात्र त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या नाहीत. 5 सामन्यात तो केवळ 55 धावा करू शकला. परिणामी प्लेईंग 11 मध्ये त्याला कमी संधी देण्यात आली नाही. कदाचित या सीजननंतर सीएसके राहुल त्रिपाठीला रिलीज करू शकतो.
डेवाॅन कॉनवेला मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने 6.25 कोटींना करारबद्ध केलं होतं. पण 4 सामन्यात तो केवळ 94 धावा करू शकला. तेव्हा कदाचित आयपीएल 2025 नंतर सीएसके डेवाॅनला रिलीज करेल.
फलंदाज दीपक हुडाला सीएसकेने 1.7 कोटींना करारबद्ध केलं होतं. मात्र 6 सामन्यात तो केवळ 31 धावा करू शकला. तेव्हा कदाचित आयपीएल 2025 नंतर सीएसके दीपकला रिलीज करेल.