श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वेगवान सुरुवात केली होती. डावाच्या पहिल्याच षटकात त्याने षटकार ठोकला. पण चौथ्या षटकात 11 धावांवर तो बाद घोषित झाला.
दिलशान मदुशंकाच्या चेंडूवर अंपायर जोएल विल्सनने वॉर्नरला एलबीडब्ल्यू घोषित केले. डीआरएसमध्ये ऑनफिल्ड कॉलमुळे रिव्ह्यू झाला पण वॉर्नरला परतावे लागले.
स्क्रीनवर ऑनफिल्ड कॉल येताच डेव्हिड वॉर्नर अंपायरवर चिडला. आधी त्याने रागाच्या भरात त्याच्या पॅडवर बॅट मारली. यानंतर तो अंपायरच्या दिशेने ओरडू लागला.
श्रीलंकेविरुद्ध चुकीच्या अंपायरिंगमुळे विकेट गमावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने हे वक्तव्य केले आहे. तिसऱ्या पंचाने मैदानी पंचाच्या निर्णयासोबत जाऊन वॉर्नरला बाद घोषित केले. यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना वॉर्नर अंपायरवर चांगलाच चिडला.
पंचांनी त्यांच्या कारकिर्दीत किती योग्य आणि किती चुकीचे निर्णय घेतले याची आकडेवारी मला मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल, असे वॉर्नरने म्हटलं आहे.
वॉर्नरच्या या विधानामुळे थेट अंपायरच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विधानामुळे आयसीसी त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते.
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक सायमन डोल यांनी वॉर्नरवर कारवाई करण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. डलने वॉर्नरवर काही सामन्यांसाठी बंदी घालण्याची मागणी केली आहे.