क्रिकेट आणि फिल्मी दुनियेचं नातं तसं जुनच आहे. अनेक क्रिकेटर्सने अभिनेत्रींशी लग्न केलं आहे.

यात आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावाचाही समावेश झाला आहे. बाबरचं नाव पाकची सर्वात सुंदर अभिनेत्री हानिया आमिरशी जोडलं जातंय.

बाबर आझम आणि हानिया आमिर एकमेकांना डेट करतअसल्याची चर्चा सुरु झाली आहे. हानिया पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

एका एडिटेड व्हिडिओनंतर बाबर आणि हानियाच्या रोमांसची चर्चा सुरु झाली. या व्हिडिओत दोघं एकमेकांचं कौतुक करताना दिसतायत.

एका चाहत्याने हानियाला नसीम शाह आणि बाबर आझमपैकी तुला सर्वात जास्त कोणता क्रिकेटर आवडतो असा प्रश्न विचारला. यावर हानियाने बाबर आझमचं नाव सांगितलं.

तर एका मुलाखतीत बाबर आझमला तु चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करशील असा प्रश्न विचारण्यात आला होता.

बाबर आझमसमोर तीन पर्यात ठेवण्यात आले. यात माहिरा खान, मेहविश हयात आणि हानिया यांची नावं होती. बाबर आझमने हानिया आमिर आपली अभिनेत्री असेल असं सांगितलं.

एका युजरने दोघांच्या मुलाखतीचे व्हिडिओ एकत्र करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केलेत. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की दोघांच्या चाहत्यांनी मॅचमेकिंगही सुरु केलंय.

हानिया आमिर 26 वर्षांची असून लॉलीवूडची ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मेरे हमसफर, तितली, इश्किया सारख्या मालिकांमधून तीने अभिनायाची छाप उमटवली आहे.

VIEW ALL

Read Next Story