पाकिस्तानचा कोच होणार भारताचा 'हा' माजी क्रिकेटपटू? म्हणाला, 'मला पाकिस्तानला..'

भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या राजकीय वादामुळे मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आमने-सामने

भारत आणि पाकिस्तानचे संघ मागील अनेक वर्षांपासून केवळ अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आमने-सामने येत आहेत. प्रामुख्याने आशिया चषक आणि वर्ल्ड कपचे सामने दोन्ही संघ खेळलेत.

पाकिस्तानसाठी मदतीचा हात

याच दरम्यान भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने पाकिस्तानी संघासाठी मदतीसाठी हात पुढे केला आहे.

प्रशिक्षक होण्याची तयारी

आपण पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक होण्यास तयार असल्याचं या भारतीयाने म्हटलं आहे.

धक्कादायक अनुभव

अफगाणिस्तानसाठी वर्ल्ड कप 2023 जितका अविस्मरणीय ठरला तितकाच धक्कादायक अनुभव पाकिस्तानसाठी होता.

बाबरने पद सोडलं

पाकिस्तानने वर्ल्ड कप 2023 मध्ये केलेल्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझमने नेतृत्व सोडलं.

3 वेगवेगळे कर्णधार

पाकिस्तानने क्रिकेट बोर्डाने बाबरने पद सोडल्यानंतर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार निवडलेत.

पाकिस्तानचा कोच होण्याची भारतीयाची इच्छा

आता पाकिस्तानी कोचचा शोध सुरु असतानाच एका भारतीयाने आपण पाकिस्तानला प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं आहे.

कोण आहे हा खेळाडू?

पाकिस्तानी संघाचा कोच होण्याची ही ऑफर माजी अष्टपैलू खेळाडू अजय जडेजाने दिली आहे.

मोलाचा वाटा

अफगाणिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये मिळवलेल्या यशामध्ये जडेजाने मोलाचा वाटा उचलला आहे.

अफगाणिस्तानने कोणाला केलं पराभूत

अफगाणिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंकेला पराभूत केलं.

पाकिस्तानचा कोच व्हायला आवडेल

'स्पोर्ट्स तक'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजय जडेजाला पाकिस्तानी संघाचा कोच व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जडेजाने 'हो मी तयार आहे,' असं उत्तर दिलं.

माझ्याकडील ज्ञान देण्यास तयार

"मी माझ्याकडील ज्ञान अफगाणिस्तानी संघाबरोबर वाटून घेतलं. मला वाटतं की पाकिस्तानी संघही एकेकाळी अफगाणिस्तानसारखा होता," असं जडेजा म्हणाला आहे.

VIEW ALL

Read Next Story