ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सेवलचा व्हिक्टोरियामधील अॅबरफिडील येथे फारच आलिशान आणि मोठा बंगला आहे.
नदी किनारी असलेला मॅक्सेवलचा हा परिसर येथील सर्वोत्तम प्रॉपर्टी डेस्टीनेशन म्हणून ओळखला जातो.
अॅबरफिडीलमधील 37 बिव्हर स्ट्रीट येथील हा बंगला एक 4 BHK घर आहे.
मॅक्सेवेलच्या या आलिशान बंगल्याला फार मोठं आंगणं आहे. या ठिकाणी मोठी पार्टीही आयोजित करता येईल एवढी जागा आहे.
मॅक्सेवेलचा बंगल्यातील रुममधील फ्लोअर हाईट, रुमची लांबी-रुंदी सारं काही अगदी ऐसपैस आहे. रुममध्ये फॉर्मल आणि कॅज्युअल डिझाइनचा मेळ घातला आहे.
812 स्वेअर मिटरच्या जमीनीवर हा बंगला पसरलेला आहे. या बंगल्याच्या आजाबाजूला फार हिरवळ असून भरपूर मोकळी जागा आहे.
3.4 मीटर सिलिंग, वेगळ्या शैलीत साकारलेले दरवाजे, मोठी झुंबरं या साऱ्यामधून व्हिक्टोरियन शैली अधोरेखित करण्यात आली आहे.
टिंबर फ्लोअर्स, हिटींग आणि रेफ्रिजरेटर कुलींग, 4 गॅस प्लेसेस, स्टायलिस्ट फॅमेली बाथरुम अशी या बंगल्याची वैशिष्ट्ये आहेत.
मॉल्स, शाळा आणि मोठ्या बगीचा मॅक्सवेलच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहेत. या ठिकाणावरील सर्वोत्तम लाईफस्टाईल येथे उपलब्ध आहे.