स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मॉडेल माहिका शर्माला डेट करत असल्याचं त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कबूल केलंय.
हार्दिक पांड्या ने 2020 मध्ये नताशा स्टेनकोविक हिच्याशी लग्न केलं. मात्र 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघे लग्नापूर्वी दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते.
2016 मध्ये हार्दिक पांड्या मॉडेल लिशा शर्मा हिला डेट करत होता.
2017 दरम्यान हार्दिक पांड्याचं नाव हे एली अवराम या स्वीडनच्या अभिनेत्री सोबत जोडलं गेलं होतं. एली कृणाल पंड्याच्या लग्नात सुद्धा आली होती. मात्र 2017 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.
2018 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताचे नाव हार्दिकसोबत जोडले गेले होते, परंतु दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही. पण ईशा गुप्ताने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की ती हार्दिकच्या खूप क्लोज होती.
नताशा स्टॅन्कोविचशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचे नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाशी जोडले गेलं. मात्र 2025 च्या सुरुवातीनंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना हळूहळू विराम लागला.