इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले.
या शतकासह रोहितने ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकलंय.
ख्रिस गेलने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून 42 शतके झळकावली आहेत. तर आता रोहित शर्माच्या नावावर 43 शतकं झाली आहेत.
या यादीत रोहितच्या पुढे फक्त दोन फलंदाज आहेत. ज्यामध्ये पहिला डेव्हिड वॉर्नर आहे.
वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 49 शतके झळकावली आहेत.
तर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ओपनर म्हणून 45 शतके झळकावली आहेत.