देशासाठी क्रिकेट खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. टीम इंडियाची जर्सी जेव्हा खेळाडू परिधान करतो, त्या वेळी तो क्षण त्याच्यासाठी सन्मान असतो.

Nov 16,2023


टीम इंडियाची जर्सी परिधान केल्यावर खेळाडूंना जर्सी नबंर मिळतो. टीम इंडियात असे अनेक महान क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांचा जर्सी नबंर खूप प्रसिद्ध झाला.


पण तुम्हाला माहित आहे का खेळाडूंना हा जर्सी नंबर दिला कसा जातो. जर्सी नंबर देण्याचा अधिकार कोणाला असतो. यासाठी काही वेगळे नियम आहेत का?


टीम इंडियात खेळाडूंना जर्सी नंबर देण्याचा कोणताही नियम नाहीए, खेळाडू आपल्या आवडीचा नंबर निवडतात, यात क्रिकेट बोर्ड कोणताही हस्तक्षेप करत नाही


पण एका गोष्टीवर लक्ष ठेवलं जातं ते म्हणजे त्या नंबरची जर्सी इतक कोणत्या खेळाडूकडे नाही. इतर कोणाकडे तोच नंबर असेल तर खेळाडूला दुसरा नंबर निवडवा लागतो.


विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर 18 आहे. विराटच्या वडिलांचं निधन 18 डिसेंबर 2006 साली झालं. शिवाय त्याने 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यामुळे हा नंबर त्याच्यासाठी खास आहे.


टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंहच्या 12 नंबर जर्सीचीही अशीच कहाणी आहे. युवराजचा जन्म 12 डिसेंबरला झाला. त्यामुळे त्याने हा जर्सीसाठी हा खास नंबर निवडला

VIEW ALL

Read Next Story