Dream 11 एका मॅचसाठी BCCI ला किती पैसे देते?

Published by: Pooja Pawar | Aug 24, 2025

टीम इंडियाच्या जर्सीवर सध्या मुख्य प्रायोजक म्हणून ड्रीम 11 चे नाव दिसते. मात्र आता लवकरच BCCI टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजकत्वासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 24, 2025

त्यामुळे आता टीम इंडियाच्या जर्सीवर Dream 11 हे नाव दिसणार नाही.

Published by: Pooja Pawar | Aug 24, 2025

ड्रीम 11 ने 358 कोटी रुपयांना टीम इंडियाचे लीड स्पॉन्सरशिप हक्क विकत घेतले होते. बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा हा करार जुलै 2023 ते मार्च 2026 पर्यंत होता.

Published by: Pooja Pawar | Aug 24, 2025

बीसीसीआय सोबत केलेल्या करारानुसार Dream 11 भारतात खेळवण्यात येत असलेल्या एका सामन्यासाठी 3 कोटी रुपये देते.

Published by: Pooja Pawar | Aug 24, 2025

केंद्र सरकारने रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर टीम इंडियाचे सध्याचे प्रमुख प्रायोजक ड्रीम 11 भोवती अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच सध्याच्या प्रायोजकत्व कराराची मुदत सुद्धा लवकरच संपणार आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 24, 2025

त्यामुळे Dream 11 नंतर भारतीय जर्सीवर मुख्य प्रायोजक म्हणून आता पुढे कोणती कंपनी झळकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: Pooja Pawar | Aug 24, 2025

VIEW ALL

Read Next Story