RJ महविश किती कमवते? स्वतः दिली हिंट

Intern
Apr 12,2025


प्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ महविश क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, यासोबतच ती तिच्या कामगिरीमुळे आणि सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटीमुळेही कायमच चर्चेत असते.


महविशने कठोर परिश्रम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं खास स्थान निर्माण केलं आहे. ती केवळ एक आरजे नाही, तर अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि चित्रपट निर्माती देखील आहे.


अलीकडेच महविशने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने अप्रत्यक्षपणे तिच्या कमाईची झलक दाखवली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून तिच्या कमाईबाबत चर्चा सुरु झाली आहे.


या पोस्टमध्ये महविशने म्हटलं आहे की, 'हे ऑफिसमधले लोक मला महिनाभर जेवढे पैसे द्यायचे, त्यापेक्षा जास्त ते मला दररोज अपमान करायचे... आता त्या पैशात मी एक इन्स्टा स्टोरीही पोस्ट करत नाही.'


या वक्तव्यानंतर अनेकांनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे की महविशची सोशल मीडियावरून होणारी कमाई किती मोठी असू शकते.


तिने पुढे लिहिलं, 'तुमच्या नवीन जॉईनरसाठी तुम्ही तो व्यक्ती बना, जो तुम्हाला सुरुवातीला हवा होता. दयाळू राहा... कारण ते मोफत आहे.'


ही पोस्ट वाचून तिचे चाहते कौतुक करत आहेत. तर अनेकांनी तिच्या यशस्वी करिअरमागचा आत्मविश्वास आणि मेहनतीचे कौतुक केले आहे.

VIEW ALL

Read Next Story