भारत - बांगलादेश यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला केकेआरने रिलीज केलं.
कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमधून 9.20 कोटींना विकत घेतलं होतं.
मुस्तफिजूर रहमानने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 7 सीजन खेळले आहेत. यात तो केकेआर, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्स इत्यादी संघांकडून खेळला होता.
मुस्तफिजूर रहमानने आयपीएल खेळून किती कोटींची कमाई केली याविषयी जाणून घेऊयात.
मुस्ताफिजुरला 2016 मध्ये पहिल्यांदा सनरायजर्स हैदराबाद संघाने 1.40 कोटींना खरेदी केलं होतं. 2017 च्या सीजनसाठी त्याला याच किंमतीवर रिटेन करण्यात आलं.
आयपीएल 2018 च्या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने मुस्ताफिजुरला 2.20 कोटी रुपये देऊन संघात घेतलं. 2019 -20 मध्ये मुस्तफिजूर रहमान खेळला नव्हता.
आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला एक कोटींना विकत घेतलं.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 आणि 2023 साठी मुस्तफिजूर रहमानला प्रत्येकी 2 कोटी देण्यात आले.
आयपीएल 2024 मध्ये मुस्तफिजूर रहमान हा चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला. त्याला 2 कोटींना खरेदी करण्यात आलं होतं. म्हणजेच एकूण आयपीएल 7 सीजनमध्ये मुस्तफिजूर रहमानने एकूण 12 कोटी रुपयांची कमाई केली.