भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून 15 ऑगस्ट 2020 मध्ये निवृत्ती घेतली होती.
बीसीसीआय निवृत्त झालेल्या भारतीय क्रिकेटर्सना पेन्शन देतं. पेन्शनची रक्कम ही संबंधित खेळाडू भारतासाठी किती सामने खेळला आहे यावर अवलंबून असते.
महेंद्र सिंह धोनीने भारतासाठी 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी20 सामने खेळले आहेत.
धोनीने क्रिकेट करिअरमध्ये बरेच सामने संघासाठी खेळल्यामुळे तो टॉप कॅटेगरीत मोडतो. ज्यांना बीसीसीआय 50 हजार ते 70 हजार रुपये एवढी पेन्शन देते.
माहितीनुसार महेंद्र सिंह धोनीला बीसीसीआय 70 हजारहून अधिक पेन्शन देते.
एम एस धोनी प्रमाणे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड इत्यादींना 70 हजार रुपये पेन्शन मिळते. तर युवराज सिंहला 60 हजार रुपये पेन्शन मिळते.
भारतासाठी कमी सामने खेळल्याने विनोद कांबळीला 30 हजार हून अधिक पेन्शन मिळते.