निवृत्तीनंतर विराट कोहलीला BCCI कडून किती पेन्शन मिळणार?

Pooja Pawar
May 12,2025


भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.


यापूर्वी विराटने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती जाहीर केली होती. मात्र टेस्ट आणि टी 20 मधून विराट निवृत्त होत असला तरी वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो अजूनही खेळताना दिसणार आहे.


भारतीय संघासाठी खेळलेल्या क्रिकेटर्सला बीसीसीआयकडून निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. तेव्हा विराटला किती पेन्शन मिळणार याबाबत जाणून घेऊयात.


बीसीसीआयच्या नियमांनुसार 25 किंवा त्याहून जास्त टेस्ट सामने खेळणाऱ्या खेळाडूंना पेन्शन म्हणून दरमहा 70 हजार रुपये दिले जातात.


विराट कोहलीने हा भारतीय टेस्ट संघाचा माजी कर्णधार सुद्धा होता यासह त्याने टेस्ट करिअरमध्ये एकूण 123 सामने खेळले. त्यामुळे विराटला सुद्धा 70 हजार रुपये एवढी पेन्शन मिळेल.


विराट कोहली हा टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो अजूनही भारताकडून वनडे फॉरमॅटमध्ये खेळणार आहे, त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून लगेचच पेन्शन सुरु होणार नाही. तो तीनही फॉरमॅटमधून निवृत्त झाला की त्याला पेन्शन सुरु होईल.


विराट कोहलीने टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत . यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत.

VIEW ALL

Read Next Story