रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे.
रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू यांनी हा सामना इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा 7-6 (7-0), 7-5 असा पराभव केला.
ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा बोपन्ना सर्वात वयस्कर खेळाडू ठरलाय. तर ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला आहे.
या विजयानंतर रोहन बोपन्ना मालामाल होणार आहे. दुहेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर, बोपण्णा-एब्डेन जोडीला 7,30,000 ऑस्ट्रेलियन डॉलरची रक्कम मिळेल.
भारतीय रुपयांमध्ये याची किंमत सध्या सुमारे 3 कोटी, 98 लाख, 96 हजार आणि 265 रुपये आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.
याचा अर्थ प्रत्येक खेळाडूला 3 लाख 65 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स मिळतील, म्हणजेच बोपण्णाचा हिस्सा सुमारे 1,99,48,132 रुपये असेल.
ऑस्ट्रेलियन नियमांप्रमाणे तुम्हाला 1,80,000 डॉलरपेक्षा जास्त रक्कम असेल तर 45 टक्के दराने कर भरावा लागतो. ही रक्कम प्रत्येकी 89 लाख 76 हजार आणि 659 रुपये आहे.
कर भरल्यानंतर बोपण्णा यांच्या हातात सुमारे 1 कोटी, 9 लाख, 71 हजार आणि 413 रुपये असतील. भारतात मात्र, बोपन्नाला यावर कर द्यावा लागणार नाही.