नीरज चोप्राला सुवर्णपदक

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे.

नीरज चोप्राने रचला इतिहास

World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

88.17 मीटर अंतर छेदलं

नीरज चोप्राने 88.17 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

बक्षीस म्हणून 70 हजार डॉलर्स

सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला बक्षीस म्हणून 70 हजार डॉलर्स म्हणजेच 58 लाख रोख रक्कम मिळाली आहे.

अर्शद नदीमला 29 लाख रुपये

दरम्यान दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमला 29 लाख रुपये मिळाले आहेत. त्याने 87.82 मीटर दूर भाला फेकत रौप्यपदक जिंकलं.

कांस्यपदक विजेत्याला 18 लाख

तसंच 86.67 मीटर दूर भालाफेक करत कांस्यपदक जिंकणाऱ्या Czech Republic च्या जॅकबला 18 लाखांची रक्कम मिळाली.

तीन भारतीय टॉप आठमध्ये

भारतीय भालाफेकपटू किशोर जेना (84.77 मी) आणि डीपी मनू (84.14 मी) अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर राहिले. पहिल्यांदाच तीन भारतीयांनी टॉप आठमध्ये आले.

अभिनव बिंद्रानंतर नीरज चोप्रा दुसरा भारतीय

एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारा नेमबाज अभिनव बिंद्रानंतर नीरज चोप्रा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

अंजू बॉबी जॉर्ज

त्याच्या आधी, लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने 2003 च्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

VIEW ALL

Read Next Story