विराटची IPL मधील सॅलरी 21 कोटी, पण टॅक्स कापून हातात येणार एवढेच...

Pooja Pawar
Mar 26,2025


स्टार फलंदाज विराट कोहली हा आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचा भाग आहे. यंदाही मेगा ऑक्शनपूर्वी विराटला आरसीबीने 21 कोटी रुपयांना रिटेन केले.


आयपीएल संघांनी ऑक्शनपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली हा सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. तसेच तो आरसीबी संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे.


आजतागायत आयपीएलच्या 18 सीजनमधून विराटने 179.70 कोटी रुपये इतकी कमाई केली आहे.


आयपीएल 2025 खेळण्यासाठी विराट कोहलीला पगार म्हणून 21 कोटी मिळणार असले तरी त्यातील टॅक्स कापून त्याच्या हातात नक्की केवढी रक्कम येईल याविषयी जाणून घेऊयात.


कोहलीला आरसीबीकडून आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. त्यामुळे या उत्पन्नाला इनकम टॅक्स ऍक्ट 1961 चा सेक्‍शन 28 प्रमाणे income from business or profession या रूपात कॅटेगराईज केलं जाईल.


विराट कोहलीचं उत्पन्न हे 5 कोटींपेक्षा जास्त असल्याने तो हायर इनकम टॅक्‍स स्लॅबमध्ये येतो. जर त्याने न्‍यू टॅक्‍स र‍िजीमला स‍िलेक्‍ट केलं तर त्यानुसार 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर दायित्व आहे.


विराट कोहलीचं आयपीएल कॉन्ट्रॅक्टमधून मिळणार उत्पन्न हे 21 कोटी रुपये आहे. त्यातून 30% टॅक्स पकडला तर 6.3 कोटी रुपये टॅक्स होतो. परंतु 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर 25% सरचार्ज लावला जातो. अशा प्रकारे 6.3 कोटींवर ते 1.575 कोटी झाले. 6.3 कोटींच्या टॅक्सवर 4 टक्के उपकर अंदाजे 31 लाख रुपये होतात. अशाप्रकारे हे तिन्ही एकत्र केले तर सुमारे 8.19 कोटी रुपयांचा कर लागतो.


म्हणजेच आयपीएलमधून मिळणाऱ्या 21 कोटी रुपयांच्या पगारातून विराटला 8.19 कोटी रुपये टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच टॅक्स भरल्यावर विराट केवळ 12.81 कोटी रुपये घरी घेऊन जाईल.

VIEW ALL

Read Next Story