टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऑलराऊंडर अक्षर पटेलने क्रिकेट कारकिर्दीत आयसीसी क्रमवारीतील सर्वोत्तम स्थान पटकावलं आहे.

Jan 17,2024


अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर असलेला सूर्यकुमार यादव अजूनही 869 पॉईंटसह टी20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे.


टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने सात स्थानांची झेप घेतली असून त्याने थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात 739 पॉईंट जमा आहेत.


पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. यामुळेएक स्थानाचा फायदा झाला असून चौथ्या क्रमांकावर आहे.


बाबर आझमुळे दक्षिण आफ्रिकेचा टी20 कर्णधार एडन मार्करामची एका स्थानाने घसरण झाली आहे. मार्करम पाचव्या स्थानावर आहे. तर ऋतुरजा गायकवा़ नवव्या स्थानावर घसरला आहे.


टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या आयसीसी क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. टी20 गोलंदाजांच्या यादीत अक्षर पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


मोहालीत पहिल्या टी20 सामन्यात अक्षर पटेलने दोन विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

VIEW ALL

Read Next Story