आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची आणि गोलंदाजांची क्रमवारी जारी केली आहे.
अव्वल 10 फलंदाजांमध्ये भारताच्या 3 फलंदाजांचा समावेश आहे. या यादीत नेमकं कोण कितव्या स्थानी आहे पाहूयात...
सर्वोत्तम फलंदाजांच्या टॉप 10 च्या यादीत तळाला पाकिस्तानचा फकर झमान आहे. त्यांच्या नावावर 705 गुण आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे.
9 व्या स्थानी भारताचा कर्णधार रोहित शर्मा असून त्याने 707 गुणांसहीत एका स्थानाने झेप घेतली आहे.
पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतरही विराटची एका स्थानाने घसरण झाली असून तो 715 पॉइण्ट्ससहीत आठव्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने एका स्थानाने झेप घेतली आहे. डिकॉक हा 721 पॉइण्ट्सहीत सातव्या स्थानी आहे.
सहाव्या स्थानी आर्यलंडचा हॅरी ट्रकर असून त्याचे एकूण 726 पॉइण्ट्स आहेत.
पाकिस्तानचा इमाम-उल-हक एका स्थानाने घसरून पाचव्या स्थानी आला आहे. त्याचे एकूण 735 पॉइण्ट्स आहेत.
चौथ्या स्थानी 739 गुणांसहीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर आहे. त्याने एका स्थानने झेप घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा रेसी व्हॅन डेर ड्युसेन हा 745 पॉइण्ट्सहीत तिसऱ्या स्थानी आहे.
दुसऱ्या स्थानी भारताचा सलामीवर शुभमन गिल आहे. शुभमनचे एकूण 759 पॉइम्टस आहेत.
पहिल्या स्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. बाबरचे एकूण 863 पॉइण्ट्स आहेत. पहिले तिन्ही फलंदाज या यादीत जैसे थे क्रमांकावर आहेत.
गोलंदाजांच्या यादीमध्ये कुलदीप यादवने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. त्याचे एकूण 656 पॉइण्ट्स आहेत.
तर भारताचा मोहम्मद सिराज हा आहे त्या ठिकाणी म्हणजे नवव्या स्थानी कायम आहे. त्याच्या नावावर 643 पॉइण्ट्स आहेत.