वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाचा पहिला सामना सहा ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध रंगणार आहे. यानंतर दहा तारखेला श्रीलंकेविरुद्ध तर 14 तारखेला भारताविरुद्ध सामना रंगणार आहे.
वर्ल्ड कप सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खुशखबर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पीसीबीने बुधवारी खेळाडूंबरोबरच्या नव्या कराराची घोषणा केली. नव्या यादीत 25 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यातल्या 3 खेळाडूंना ए कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे.
ए कॅटेगरीत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहिन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे. त्यांच्या पगारात तब्बल 202 टक्के वाढ करण्यात आलीय
कॅटेगरी बीमध्य समावेश करण्यात आलेल्या खेळाडूंच्या पगारात 144 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर सीमधल्या खेळाडूंची 135 आणि डीमधल्या खेळाडूंची 127 टक्के पगारवाढ करण्यात आलीय
इतकंच नाही तर सर्व खेळाडूंच्या मॅच फीमध्येही वाढ करण्यात आली आहे. यात कसोटी क्रिकेसाठी 50 टक्के, एकदिवसीय क्रिकेटसाठी 25 टक्के आणि टी20 क्रिकेटसाठी 12.5 टक्के वाढ करण्यात आलीय.
वर्ल्ड कप पूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे खेळाडू मॅच फीवरुन नाराज असल्याची चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर पीसीबीने हा मोठा निर्णय घेतला आहे.