टीम इंडियाच्या मिशन वर्ल्डकपला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भरताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून चेन्नईतल्या चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाईल.
विश्वचषक स्पर्धेत सर्वांचं लक्ष लागलेला पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.