यंदाच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या भारतासाठी स्पर्धेची अखेर निराशाजनक झाली.
क्रिकेट विश्वचषकाने हुलकावणी दिल्याने आता भारतीय क्रिकेटप्रेमींना पुढच्या क्रिकेट वर्ल्डकपबाबत उत्सुकता लागलीये.
पुढचा वर्ल्डकप हा स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये संयुक्तरित्या खेळवली जाणार आहे.
पुढचा वर्ल्डकप हा स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये संयुक्तरित्या खेळवली जाणार आहे.
2027 साली दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत 14 टीम्स खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे यजमान असल्याने हे संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.
आफ्रिका खंडातील नामिबीयाचा संघही या स्पर्धेचा सहजनमान असेल. मात्र त्याच्या सहभागाबाबत निश्चिती नाही आहे. त्याचं कारण म्हणजे नामिबिया हा अद्याप आयसीसीचा पूर्ण सदस्य बनलेला नाही. म्हणजेच नामिबियाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता निकषांचं पालन करावं लागेल.