विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी केली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया या स्पर्धेत अपराजित आहे. टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकले असून त्यांच्या ख्यातात दहा पॉईंट जमा आहेत.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांचा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडियांच सेमीफायनलचं स्थान जवळपास निश्चित आहे.
पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडची कामगिरीही चांगली झालीय.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने पाच सामन्यांपकी चार सामन्यात विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडविरुद्ध तर न्यूझीलंडला भारताविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागलाय.
त्यामुळे टीम इंडिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं स्थान जवळपास निश्चित आहेत. या संघांचा नेट रनरेटही तगडा आहे.
चौथ्या स्थानासाठी मात्र चांगलीच चुरस आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दोन सामने जिंकत जबरदस्त कमबॅक केलंय.