रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपला सुरुवात केलीय. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा पहिला सामना चेन्नईत खेळवण्यात आला.

टीम इंडियाचा दुसरा सामना 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. तर सर्वांना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं. आगे. पण या सामन्याआधी सोशल मीडियावर एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया भगव्या रंगाच्या जर्सीत खेळणार असल्याचा दावा व्हायरल बातमीत करण्यात आला आहे.

बातमी व्हायरल झाल्यनंतर बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारने एक निवेदन जारी केलं आहे. शेलार यांनी व्हायरल होणारे सर्व दावे खोडून काढले आहेत,

पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया भगव्या जर्सीत खेळणार असल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आणि निराधार असल्याचं आशीष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतीय क्रिकेट संघ आपल्या पारंपारिक निळ्या रंगाच्या जर्सीतच हा सामना खेळणार आहे. भगवी जर्सी केवळ टीम इंडिया केवळ सरावासाठी वापरत आहे.

VIEW ALL

Read Next Story