विश्वचषक स्पर्धेत 10 संघांदरम्यान येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकासाठी चुरस रंगणार आहे. तब्बल 46 दिवस क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामन्यांची मेजवाणी मिळणार आहे.
स्पर्धा सुरु होण्यआधी आम्ही तुम्हाला या स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वात श्रीमंत कर्णधार कोण याची माहिती देणार आहोत.
विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वात टॉपवर असलेल्या कर्णधाराचं नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल
सर्वात श्रीमंत कर्णधाराच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या कर्णधाराच्या नावावर आतापर्यंत एकाही मोठ्या स्पर्धेच्या जेतेपद नाही. तरीही तो भारत-ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज खेळाडूंपेक्षाही श्रीमंत आहे.
श्रीमंत कर्णधारांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॅट कमिंसचं नेटवर्थ 350 कोटी रुपये इतकं आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माचं नेटवर्थ 210 कोटी रुपयांहून अधिक आहे.
श्रीमंत कर्णधारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन. गेल्या 17 वर्षांपासून शाकिब बांगलादेशसाठी खेळतोय. जगातल्या श्रीमंत खेळाडूंपैकी तो एक आहे.
शाकिल अल हनचं नेट वर्थ तब्बल 600 कोटी रुपये इतकं आहे. पेप्सीको, बुस्ट सारख्या मोठ्या ब्रँडसाठी तो जाहीरात करतो. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो.