क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला जाणार आहे
पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठा चमत्कार करावा लागणार आहे.
या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाजी वीरेंद्रे सेहवागने ट्विट करत पाकिस्तान संघाला डिवचलं आहे.
सेहवागने आपल्या X अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय 'पाकिस्तान जिंदाभाग, आपकी घरवापसी शुभ हो'
यात पुढे त्याने म्हटंलय, 'पाकिस्तानची एक गोष्ट खास आहे, ज्या संघाला ते पाठिंबा देतात तो संघ पाकिस्तानसारखा खेळू लागतो, सॉरी श्रीलंका'
पाकिस्तानचा वर्ल्डकप सेमीफायनलचा प्रवेश जवळपास अशक्य आहे. शेवटच्या सामन्यात इंग्लंडला 287 धावांच्या फरकाने हरवावं लागणार आहे.
पाकिस्तान इंग्लंडदरम्यानचा सामना 11 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळवला जाणार आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे.