भारतात येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर बीसीसीआय या स्पर्धेचं आयोजन करतंय.
याआधी 2011 मध्ये भारता विश्वचषक स्पर्धा झाली होती. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं
आता 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडिया विश्वचषक पटकावणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पण 2011 मधले टीम इंडियातले खेळाडू आता काय करतात?
2011 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या 15 खेळाडूंपैकी तब्बल 13 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे.
15 खेळाडूंपैकी सध्या केवळ विराट कोहली आणि आर अश्विन भारतीय संघात आहेत. यापैकी विराट कोहली आताच्या विश्वचषक संघात आहे. तर अश्विनचा समावेश होण्याची शक्यता आहे.
त्यावेळचा कर्णधार एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, पीयूष चावला, आशीष नेहरा आणि जहीर खान या खेळाडूंनी सन्यास घेतला असला तरी ते या ना त्या कारणाने क्रिकेटशी जोडले गेले आहेत.
मुनाफ पटेल, युसूफ पठाण, सुरेश रैना, हरभजन सिंग, युवराज सिंह आणि एस श्रीसंत क्रिकेट कॉमेंट्रीत व्यस्त आहेत.