आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात ऑस्टेलिया आणि नेदरलँडदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियान विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे.

Oct 25,2023


ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना 50 षटकात 8 विकेट गमावत 399 धाव्या केल्या. तर नेदरलँडचा संघ अवघ्या 90 धावात ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाने तब्बल 309 धावांनी विजय मिळवला


या सामन्यात आणखी एक विक्रम रचला गेला आहे. नेदरलँडचा गोलंदाजाच्या नावावर एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.


नेदरलँडचा वेगवान गोलंदाज बास डी लीडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसलाही मागे टाकलं आहे.


बास डी लीडेने 10 षटकात 11.50 च्या इकोनॉमी रेटने तब्बल 115 धावा दिल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारा तो गोलंदाज ठरला आहे.


याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवागन गोलंदाज मिक लुईसने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकात 113 धावांची खैरात केली होती. आता हा विक्रम मागे पडला आहे.


दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकट्या मॅक्सवेलने 40 चेंडूत शतक ठोकलं.

VIEW ALL

Read Next Story