आयसीसी विश्वचषकात बाबर आझमचा पाकिस्तान क्रिकेट संघ स्पर्धेतून बाहेर होणारा पहिला संघ ठरु शकतो.
बलाढ्य मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानवर सलग तीन सामने हरण्याची नामुष्की ओढावलीय. पाच सामन्यात पाकिस्तानने केवळ दोन सामने जिंकलेत.
दोन सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या खात्यात 4 पॉईंट जमा झालेत. तर पाकिस्तानचा रनरेटही -0.400 इतका वाईट आहे.
पाकिस्तानला स्पर्धेत आणखी चार सामने खेळायचे आहेत. यात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे.
हे चराही संघ तगडे आहेत. अशात चारपैकी एक सामनाही पाकिस्तानने गमावला तर त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. सेमीफायनलचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होतील
पाकिस्तानला पुढचे चारही सामने जिंकावेच लागणार आहेत. शिवाय रनरेटवरही लक्ष द्यावं लागणार आहे. पण सध्याची त्यांची कामगिरी पाहता ही शक्यता कमीच आहे.
पाकिस्तान संघाला भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतलं आव्हन टिकवण्यासाठी पाकिस्तानला प्रत्येक सामना करो या मरोचा असणार आहे.