'मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त', राम सिया राम गाण्यावर केशव महाराज म्हणतो...

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

केशव महाराज

साऊथ अफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराज जेव्हा विकेट घेतो किंवा बॅटिंगला येतो तेव्हा मैदानात गाणं वाजतं ते 'राम सिया राम'

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

भारत आणि साऊथ अफ्रिका

भारत आणि साऊथ अफ्रिका सामन्यावेळी केएल राहुलने केशव महाराजला यावर विचारणा केली होती. तू मैदानात येतो, तेव्हा हेच गाणं वाजतं का? असा सवाल त्याला केला होता.

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

विराट कोहली

केएल राहुलच्या प्रश्नावर त्याने हो म्हणत उत्तर दिलं. तर विराट कोहलीने देखील बाण दाखवल केशव महाराजचं स्वागत केलं होतं.

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

राम सिया राम

केशव महाराज मैदानात येताना राम सिया राम गाणं का लागतं? यावर स्वत: त्यानेच उत्तर दिलंय.

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

एन्ट्रीचं गाणं

राम सिया राम माझं एन्ट्रीचं गाणं आहे. मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त आहे म्हणून मला वाटते की हे माझ्यासाठी अगदी योग्य गाणं आहे, असं केशव म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

देवाचा आशीर्वाद

अनेकदा मी समोर उभा राहून हे गाणं वाजवायला सांगतो. माझ्यासाठी माझा देव हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तो मला मार्ग दाखवतो.

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

धर्म आणि संस्कृती

धर्म आणि संस्कृतीचा आदर करणे महत्त्वाचे आहे आणि मला बॅकग्राउंडमध्ये ‘राम सिया राम’ हे गाणं वाजलेलं आवडतं, असं केशव महाराज म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Jan 09, 2024

VIEW ALL

Read Next Story