भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज मोहालीत 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवणार जाणार आहे. यासाठी खेळाडूंची जोरदार तयारी सुरु आहे.
या पहिल्याच सामन्यात दोन्ही देशांतील काही खेळाडू नवे विक्रम मोडू शकतात. विक्रमांच्या उंबरठ्यावर असलेले हे खेळाडू आणि विक्रम कोणते पाहूयात...
ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मीथ या सामन्यामध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील 5 हजार धावांचा टप्पा पार करु शकतो.
सध्या स्मीथच्या नावावर 4 हजार 939 धावा आहेत. आत स्मीथने 61 किंवा अधिक धावा केल्या तर त्याच्या नावावर 5 हजार धावा होतील.
के. एल. राहुलही या सामन्यामध्ये षटकारांसंदर्भातील एक अनोखा विक्रम नोंदवू शकतो.
के. एल. राहुलच्या नावावर सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 षटकार त्याच्या नावर आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहालीमधील सामन्यात 2 षटकार मारल्यास त्याच्या नावावर 50 षटकार होतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली फिरकीपटू आर. अश्वीन हा भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अश्विन स्वत:च्या नावावर करु शकतो.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचा टप्पा गाठू शकतो.
100 षटकार मारण्याचा टप्पा ओलांडण्यासाठी डेव्हिड वॉर्नरला केवळ एका षटकाराची आवश्यकता आहे. त्याच्या नावावर 99 षटकार आहेत.
मिचेल मार्श हा सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अनोखा टप्पा ओलांडणार आहे.
मिचेल मार्शच्या नावावर सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 4 हजार 913 धावा आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 5 हजार धावा करण्यासाठी त्याला 87 धावांची गरज आहे.
भारतीय संघाला 1996 साली खेळवण्यात आलेल्या सामन्यात मोहालीमध्ये विजय मिळाला होता. म्हणजे भारताने मोहालीत आज विजय मिळवला तर तो ही एक विक्रमच ठरले कारण भारत 27 वर्षानंतर इथं सामना जिंकेल.