भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली.
बुमराह, कुलदीप आणि अक्षर पटेल यांना विकेट्स मिळाल्या पण मुकेश कुमार आणि रविचंद्रन आश्विन यांना विकेट मिळाल्या नाहीत.
रविचंद्रन आश्विन म्हणजे कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा स्टार गोलंदाज... मात्र, आश्विनला पहिल्या डावात विकेट मिळाली नाही.
2019 नंतर भारतात आर अश्विनला एकाही कसोटी डावात विकेट न मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.
आश्विनचा आणि कसोटी क्रिकेट यांचं वेगळं नातं तयार झालंय. आश्विनने आत्तापर्यंत 496 विकेट्स नावावर केल्या आहे.
आश्विनला आता टेस्टमध्ये 500 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 4 विकेटची गरज आहे.