IND vs ENG: रांची टेस्टमध्ये 'हा' खेळाडू डेब्यू करण्याची शक्यता

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात टेस्ट सिरीज खेळवली जात असून चौथा सामना 23 फेब्रुवारी रोजी रांचीत खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराहला चौथ्या टेस्ट सामन्यात विश्रांती देण्यात आली. यावेळी मुकेश संधी दिली आहे.

पण केएल राहुल चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर असून बुमराहच्या जागी कोण खेळणार असा प्रश्न समोर येतो.

बिहारचा वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहची जागा घेण्याची शक्यता आहे.

इंग्लंड लायन्सविरुद्ध आकाश दीपने उत्तम गोलंदाजी केली होती. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 2 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे चौथ्या टेस्टमध्ये आकाश दीपला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story