आयपीएलमध्ये सीएसकेकडून राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड झाल्यामुळे सध्या चर्चेत असणाऱ्या रवींद्र जडेजाने कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडलाय.
टेस्ट क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा आणि 300 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा जगातील चौथा खेळाडू बनला आहे.
जडेजाच्या पूर्वी इयान बोथम, कपिल देव आणि डॅनियल व्हेटोरी यांनी ही कामगिरी केली होती .
चारपैकी सर्वात कमी टेस्ट सामन्यांमध्ये 4000 धावा आणि 300 विकेट्स करण्याचा रेकॉर्ड इयान बोथमच्या नावावर आहे. ज्याने 72 टेस्ट सामन्यांमध्ये हे यश मिळवले.
इयान बोथमनंतर, रवींद्र जडेजा हा सर्वात जलद हा विक्रम करणारा खेळाडू आहे, त्याने 800 सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे.
जडेजाने कपिल देव यांचा रेकॉर्ड मात्र मागे टाकला, त्याने 97 टेस्ट सामन्यांमध्ये 4000 धावा केल्या आणि 300 विकेट्स घेतल्या.
डॅनियल व्हेटोरीने 101 टेस्ट सामन्यांमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा आणि 300 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या.