भारताने जिंकला चौथा सामना

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा टी-20 सामना 9 गडी राखून जिंकला.

यशस्वी जैस्वालची महत्त्वाची भूमिका

डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

यशस्वीच्या नाबाद 84 धावा

यशस्वीने केवळ 51 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 84 धावा केल्या.

टी-20 मध्ये अर्धशतक झळकावणारा सलामीवीर

आता यशस्वी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय सलामीवीर ठरला आहे.

यशस्वीची दमदार खेळी

यशस्वीने वयाच्या 21 वर्षे 227 दिवसांत अर्धशतक ठोकले आहेत. यशस्वीने रोहित शर्माचा विक्रम मोडला.

रोहित शर्माचा मोडला विक्रम

रोहित शर्माने 2009 मध्ये 22 वर्षे 41 दिवसांचा असताना इंग्लंडविरुद्ध सलामीवीर म्हणून अर्धशतक केले होते.

शुभमन गिलची साथ

शुभमन गिल आणि यशस्वी यांनी अवघ्या 15.3 षटकात 165 धावांची विक्रमी भागीदारी केली. गिलने 47 चेंडूत 3 चौकार आणि पाच षटकारांसह 77 धावा केल्या.

VIEW ALL

Read Next Story