IPL 2023 मधील रंजक रेकॉर्ड

तुम्हाला माहितीयेत का?

सर्वाधिक 200 पेक्षा जास्त धावा

IPL 23 मध्ये सर्वाधिक 200 पेक्षा जास्त धावसंख्या करण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यामध्ये मुंबई 4 वेळा तर कोलकाता, लखनऊ पंजाब आणि हैदराबादला प्रत्येकी 1 वेळा ही कामगिरी करता आलीये.

अकरा शतकं

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अकरा शतकांची नोंद झालीये. आणखी दोन सामने बाकी आहेत.

विराट कोहली

विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने ख्रिस गेलच्या मागे टाकलंय.

मोहम्मद शमी

पंधरा सामन्यांमध्ये प्रत्येकी 17.38 धावांत 26 विकेट्स घेऊन मोहम्मद शमी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

सर्वाधिक षटकार

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 1085 षटकार मारले गेले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या यंदा मोजली गेलीये.

फाफ डू प्लेसिस

फाफ डू प्लेसिसने 14 डावात 36 सिक्स ठोकले आहेत. या आयपीएलमधील सर्वात जास्त सिक्स ठोकणारा फलंदाज ठरलाय.

500 पेक्षा जास्त धावा

यंदाच्या आयपीएलमध्ये 500 पेक्षा जास्त धावा केलेले सात फलंदाज आहेत.