मुकेश कुमार

मुकेशला आयपीएल-2023 च्या लिलावात दिल्लीने 5.5 कोटींच्या किमतीत विकत घेतले आणि सीझनच्या पहिल्याच सामन्यात त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पंजाबने दिल्लीकडून त्यांच्यासाठी युद्ध लढवले होते, पण शेवटी दिल्लीचा संघ जिंकला होता.

चेतन साकारिया

2021 मध्ये राजस्थान रॉयल्ससह आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर, चेतन साकरीया दिल्ली कॅपिटल्सकडून खेळून आयपीएल खेळत आहे. सौराष्ट्रचा हा वेगवान गोलंदाज गेल्या वर्षी भारताकडून खेळला आहे.

कुलदीप यादव

गेल्या मोसमात कुलदीपने 14 सामन्यात 20 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरच कुलदीपने टीम इंडियात पुनरागमन केले आणि गेले 6 महिने त्याच्यासाठी खूप चांगले गेले. त्याने तिन्ही फॉरमॅटच्या 20 सामन्यांमध्ये एकूण 38 विकेट घेतल्या.

खलील अहमद

आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. खलील अहमदने आयपीएल 50 विकेट्स पूर्ण केल्या. 1 एप्रिल रोजी, आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला आणि विजयासह स्पर्धेची सुरुवात केली.

अक्षर पटेल

सर्वोत्तम फॉर्ममध्ये धावणाऱ्या अक्षर पटेलला वरच्या फळीत फलंदाजीची संधी मिळू शकते. दिल्लीचे कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरच्या हाती आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक सौरव गांगुली म्हणाले की, संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला क्रमवारीत हलवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

रोवमन पॉवेल

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने केवळ 18 चेंडूत नाबाद 43 धावा करून आपल्या संघाला सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट पार्क येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन विकेट्सने विजय मिळवून दिला.

सर्फराज खान

सरफराज खान क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास 37 सामन्यांमध्ये 80 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत ज्यात 13 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 301 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

मिचेल मार्श

मिचेल मार्शला दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला भरीव रक्कम देऊन आपल्या संघाचा भाग बनवले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मार्शला 2 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.

रिले रुसो

आयपीएल 2023 साठी झालेल्या मिनी लिलावात दिल्लीने 4.60 कोटी रुपयांची मोठी बोली लावून रूसोचा त्यांच्या संघात समावेश केला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्याकडून रिले रुसो अॅक्शनमध्ये दिसणार आहे.

पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 189 धावा केल्या आहेत. शॉने एकमेव टी 20 सामन्यात शून्य धावा केल्या आहेत, तर आयपीएलच्या 63 सामन्यांमध्ये त्याने 1588 धावा केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार)

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार आहे. डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सपूर्वी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. हैदराबादने त्याच्या नेतृत्वाखाली एकूण 76 सामने खेळले, त्यापैकी 35 सामने जिंकले, तर 31 सामने हरले. डेव्हिड वॉर्नर आयपीएलचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

VIEW ALL

Read Next Story