मुंबईच्या संघात बुमराहच्या जागी झाय रिचर्डसनची वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र तो सुद्धा दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकणार नाही.
बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असल्याने तो संघातून बाहेर आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये जाऊन ऑप्रेशनही करुन घेतलं आहे. मात्र तो 2023 चं आयपीएल खेळणार नाही हे निश्चित आहे.
मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह यांच्या पर्वात एकही सामना खेळणार नाही. आशिया चषक 2022 नंतर तो संघातून बाहेरच आहे.
कार अपघातातून ऋषभ पंतचा जीव थोडक्यात बचावला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तो यंदाच्या सीझनमध्ये खेळणार नसल्याने दिल्लीचं नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही यंदाच्या आयपीएलमधून बाहेर आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातात पंत गंभीर जखमी झाल्याने मैदानापासून दूर आहे.
मागील पर्वात कमिन्सला विशेष कामगिरी करता आली नव्हती. कमिन्स कोलकात्याच्या संघासाठी फारच महागडा खेळाडू ठरला होता.
ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पॅट कमिन्स हा यंदाच्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार होता. मात्र व्यस्त शेड्युलमुळे त्याने आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. कमिन्स यंदाच्या पर्वात दिसणार नाही.
दुखापतीमुळे प्रसिद्ध कृष्णाचं नुकतंच ऑप्रेशन झालं आहे. त्यामुळे तो पुढील अनेक महिने मैदानापासून दूर असेल. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या असल्याने त्याच्यावर ऑप्रेशन करण्यात आलं.
आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयर्सच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचं योगदान देणारे प्रसिद्ध कृष्णा यंदा राजस्थानकडून आयपीएल खेळू शकणार नाही.
ऑप्रेशन झाल्याने काइल सध्या मैदानापासून दूर आहे. मागील वर्षी बंगळुरुकडून खेळलेला काइल यंदा चेन्नईच्या संघाकडून खेळणं अपेक्षित होतं. मात्र त्याला अजून एक वर्ष तरी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसन यंदाच्या म्हणजेच 2023 चं आयपीएल पर्व खेळणार नाही.