खेळाडू ट्रेड करुन झाल्यानंतर आयपीएलमधील 10 संघांकडे लिलावासाठी नेमका किती पैसा उरला आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...
लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाकडे सर्वात कमी म्हणजे 13.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांना या पैशांमधूनच खेळाडू विकत घ्यावे लागणार आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या संघाकडे 14.5 कोटी रुपये उरले आहेत. राजस्थानच्या संघाला 15 कोटींच्या आतच हवे ते खेळाडू संघात घेता येतील.
मुंबई इंडियन्सच्या संघाकडे 17.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजेच मुंबईला या 17.75 कोटींमध्येच खेळाडूंच्या खरेदीचे व्यवहार करावे लागतील.
20 कोटींहून अधिक पैसा असलेल्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा समावेश होतो. आरसीबीकडे 23.25 कोटी रुपये शिल्लक आहेत.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडे 28.95 कोटी रुपये शिल्लक आहेत. 2024 च्या लिलावामध्ये दिल्लीला 28.95 कोटींमध्येच खरेदी करावी लागणार आहे.
पंजाब किंग्ज संघाकडे 29.1 कोटी रुपये शिल्लक आहेत. सर्वाधिक पैसे शिल्लक अशलेल्या संघांमध्ये पंजाबचा समावेश आहे.
महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जकडे 31.4 कोटी रुपये शिल्लक आहेत.
32.7 कोटी रुपयांसहीत कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सर्वाधिक पैसे शिल्लक असलेल्या आयपीएलच्या संघांपैकी एक आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद अनेक चांगले खेळाडू खरेदी करु शकतो.
गुजरात टायटन्सचा संघ सर्वाधिक पैसे शिल्लक असलेला संघ असून त्यांच्याकडे एकूण 38.15 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.