कर्णधार ऋषभ पंतच्या पुनरागमनाशिवाय दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएलच्या यंदाच्या हंगामात काहीच चांगलं घडत नाहीए,
दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यात कोलकाता नाईट रायजर्सविरुद्ध 106 लाजीरवाण्या पराभवाचा समावेश आहे.
पराभवाशिवाय दिल्लीच्या पंतला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव दुकापतग्रस्त झाला आहे.
दुखापतीमुळे कुलदीप यादव गेले दोन सामने दिल्ली संघाकडून खेळू शकला नाही. आता पुढचे सामनेही खेळणारकी नाही याबाबत साशंकता आहे.
ईएसपीए-क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार कुलदीप यादवला ग्रोईनच्या दुखापतीने सतावलं आहे. त्यामुळे तो संघात कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कुलदीपची दुखापत जास्त गंभीर नाही. पण त्याला विश्रांतीची गरज आहे.
कुलदीप यादवच्या फिटनेसवर बीसीसीआयचंही लक्ष आहे. जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप होणार आहे. कुलदीप टीम टीम इंडियाचा प्रमुक फिरकी गोलंदाज आहे.