आयपीएल युवा खेळाडूंचा खेळ समजला जातो. पण यावेळी काही असे खेळाडू आहेत जे चाळीशीजवळ पोहोचले आहेत.
आयपीएल 2024 मध्ये सर्वात वयस्क खेळाडू चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने चेन्नईला तब्बल 5 वेळा जेतेपद मिळवून दिलंय.
धोनीचं आजच्या तारखेला वय 42 वर्ष आणि 257 दिवस इतक आहे. येत्या 7 जुलैला तो वयाची 43 वर्ष पूर्ण करेल.
सलामीच्या सामन्यात खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसही चाळीशीच्या जवळ पोहोचलाय. त्याचं वय 39 वर्ष 251 दिवस इतकं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आणखी एक वयस्क खेळाडू म्हणजे दिनेश कार्तिक. कार्तिकचं आजच्या तारखेपर्यंत वय 38 वर्ष 293 दिवस आहे.
मुंबई इंडियन्सने यावेळी आपल्या संघात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचा समावेश केला आहे. नबीचं वय 39 वय आणि 79 दिवस इतकं आहे.
गुजरात टायटन्सचा विकेटकिपर ऋद्धिमान साहा देखील 40 जवळ पोहोचला आहे. सहाचं आताचं वय 39 वर्ष 148 दिवस इतकं आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वयात पदार्पण करणार खेळाडू राजस्थान रॉयल्स प्रवीण तांबे आहे. प्रवीण तांबेने वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण केलं होतं.