भारतीय क्रिकेट इतिहातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्र सिंग धोनी. धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी खिताब पटकावले.
एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेतली आहे. पण आयपीएलमध्ये तो अजूनही खेळतोय. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे.
आयपीएल 2023 च्या हंगामानंतर धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होणार अशी चर्चा होती. पण नव्या हंगामात चेन्नईने जारी केल्लाय रिटेन लिस्टमध्ये धोनीच्या नावाचा समावेश आहे.
एम एस धोनीबाबत सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 आयपीएलमध्ये धोनी खेळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
धोनी आपल्या वक्तव्यावर एकदम ठाम असतो, त्याने 2024 हंगामात खेळण्याचं आश्वासन दिलं आहे, त्यामुळे तो खेळणारहे निश्चित असल्याचं काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केलंय.
2023 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर धोनीने पुढच्या हंगामात खेळण्याचे संकेत दिले होते. आपल्याकडे सात-8 महिन्यांचा पुरेसा वेळ असल्याचं त्याने सांगितलं होतं.
आयपीएल 2023 हंगामात धोनी एकूण 16 सामने केळला. यात त्याने 182.45 च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या.