मागील वर्षी अचानक आरसीबीच्या ताफ्यात सामील झालेल्या 38 वर्षांच्या केदार जाधवला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
स्टीव स्मिथ गेल्या 2 सिझनमध्ये आयपीएलमध्ये दिसला नाही. तर 2023 मध्ये तो अनसोल्ड राहिला होता.
वर्ल्ड कपमध्ये फेल ठरलेल्या अँजिलो मॅथ्यूजने 2017 नंतर आयपीएलमध्ये खेळला नाही. त्यामुळे त्याच्यावर डाव लावणंची चूक कोणीही करणार नाही.
टीम इंडियाच्या हनुमा विहारीने 2019 नंतर आयपीएलमध्ये पाऊल ठेवलं नाही. त्यामुळे यंदाही त्याला घरीच बसावं लागेल, अशी शक्यता आहे.
मागील वर्षी गुजरात टायटन्सकडून सुमार कामगिरी करणाऱ्या क्रिस जॉर्डनला यंदा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या 4 वर्षापासून आयपीएलपासून लांब असलेल्या मार्टिन गप्टिलला यंदा कोण घेणार का? असा सवाल विचारला जातोय.
न्यूझीलंडचा सलामीवीर फटाकेबाज फलंदाज कोरी अँडरसन याला संधी मिळण्याची शक्यता नगण्य आहे.