आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्समध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विकेटकिर-फलंदाज म्हणून खेळतोय.
आयपीएलच्या सुरुवातीलाच धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाला. त्यामुळे धोनीची ही अखेरची आयपीएल स्पर्धआ असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
IPL 2023 मध्ये धोनीने आपण आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती.
आयपीएलनंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली. आता धोनीच्या निवृत्तीवर त्याचे जिगरी मित्र सुरेश रैना आणि आर पी सिंहने मोठा खुलासा केला आहे.
धोनी आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळेल असं सुरेश रैनाने म्हटंलय. धोनीची सध्याची कामगिरी पाहाता तो पुढचा हंगाम खेळू शकतो असं वक्तव्य रैनाने केलंय.
सुरेश रैनाच्या या वक्तव्यावर आरपी सिंहनेही उत्तर दिलं. धोनी एक हंगाम खेळणार असं बोलत असेल तर याचा अर्थ तो दोन हंगाम खेळेल असं आर पी सिंहने म्हटलंय.
गुडघ्यावरच्या शस्त्रक्रियेनंतर धोनी मैदानावर लंगडताना दिसलाय. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर धोनी लंगडत चालत असल्याचं दिसलं होतं.