भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आयपीएलमुळे चर्चेत आहे.
मागील 2 पर्व गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या संघात परतल्याने तो चर्चेत आहे.
आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा प्लेअर ट्रेड असल्याचं मुंबईच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. हा मास्टरस्ट्रोक मुंबईच्या कामी येईल अशी त्यांची अपेक्षा आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही आयपीएलमधील सर्वोत्तम संघ आहेत. प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी यापैकी एका संघातून खेळण्याची इच्छा असते.
मात्र जगभरातील इतर क्लब स्पोर्ट्स लिगच्या अगदी विरुद्ध नियम आयपीएलमध्ये आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे समान रक्कम उपलब्ध असते ज्यामधून ते खेळाडू विकत घेऊ शकतात.
याच पैशांच्या निर्बंधामुळे आयपीएलमधील अनेक बड्या संघांना इच्छा असूनही चांगले खेळाडू विकत घेता येत नाहीत.
अशाच एक किस्सा भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने एका मुलाखतीत सांगितलं. मुंबई इंडियन्सच्या संघाने एक खेळाडू मिळवण्यासाठी फार प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.
अश्विनने केलेल्या दाव्यानुसार मुंबई इंडियन्सच्या संघाला डेव्हीड मिलरला आपल्या संघात घ्ययाचं होतं. पंजाब किंग्जसच्या संघाला ऑल कॅश डिल देत मिलरला संघात घेण्याचा मुंबईचा विचार होता.
"मी पंजाबचा कर्णधार असताना मुंबई इंडियन्सने डेव्हिड मिलरला ट्रेड करण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केलेली," असं अश्विन युट्यूब चॅनेलवर म्हणाला.
"त्याच्या बदल्यात ते आम्ही वाटेल ती रक्कम देण्यास तयार होते. मात्र आमच्या संघाला गरज असलेला खेळाडू ट्रेडमध्ये घ्यावा असी माझी इच्छा होती. त्यामुळे यासंदर्भात पुढे काही बोलणं झालं नाही," असं अश्विनने स्पष्ट केलं.