गेल्या सामन्यात भरपूर चुका केलेल्या मोहम्मद सिराजला पुन्हा संधी मिळाली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात सिराजने पाच वाईड बॉल टाकत आयपीएलचा सर्वात लाजिरवाणा विक्रम केला होता. (फोटो - IPL)
रणजी करंडक स्पर्धेत समोरच्या संघाला घाम फोडणाऱ्या आकाश दीपने आयपीएलच्या गेल्या मोसमात 5 सामन्यात एकूण 5 बळी घेतले होते. (फोटो -IPL)
आजच्या सामन्यात जखमी रीस टॉप्लीच्या जागी ऑलराऊंडर असलेल्या डेव्हिड विलीला संधी मिळू शकणार आहे.
आयपीएलच्या 2021 हंगामातील हर्षल पटेल हा सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. आरसीबीने 2022 च्या हंगामापूर्वी लिलावात त्याला पुन्हा विकत घेण्यासाठी 10.75 कोटी रुपये खर्च केले होते.
शाहबाज अहमद हा आरसीबीचा स्टार खेळाडू आहे. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. (फोटो -PTI)
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल यावर्षी आयपीएल 2023साठी आरसीबीमध्ये सामील झाला. विल जॅकच्या जागी ब्रेसवेल संघाचा भाग बनला आहे. (फोटो -PTI)
गेल्या सामन्यात कर्ण शर्माने 4 षटकात 32 धावा देत 2 बळी घेतले होते. त्यामुळे यावेळी त्याच्याकडून उत्तम गोलंदाजीची अपेक्षा व्यक्त केली जातेय.
भारताचा जावई असलेल्या ग्लेन मॅक्सवेलचा कोलकाताविरुद्धच्या खेळाविरुद्ध स्टाईक रेट इतका काही खास नाहीये. त्यामुळे त्याला या सामन्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे
दिनेश कार्तिकला मुंबईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे या सामन्यात त्याच्या खेळीकडे लक्ष्य असणार आहे. (फोटो - BCCI)
गेल्या सामन्यात विराटच्या जोडीने फाफने 73 रन्सची खेळी केली. विराट अन् फाफने 148 धावांसाठी भागीदारी केली (फोटो -IPL)
विराट पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये परतला आहे. विराटने गेल्या सामन्यात नाबाद 82 धावांची खेळी केली.