आयपीएल 2024 सुरु होण्याच्याआधीच आरसीबी म्हणजे रॉयल चॅलंजेर्स बंगलोर संघाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

आयपीएलच्या हंगामात आरसीबीचा संघ नव्या नावाने उतरणार आहे. याचे संकेत फ्रँचाईजीने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहेत.

RCB ने जारी केलेल्या व्हिडिओत कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टी दिसतोय. या व्हिडिओत ऋषभ शेट्टी संघाचं नाव बदलण्याचे संकेत देताना दिसतोय.

आयपीएल हंगामात आता आरसीबीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या नावाने ओळखला जाणार आहे.

पण प्रश्न आहे तो म्हणजे नाव बदल्यानंतर आरबीसीचं नशिबही बदलणार का? आतापर्यंत आरबीसीला एकदाही आयपीएलचं जेतेपद पटकावता आलेलं नाही

आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली, हैदराबाद आणि पंजाब संघाने नावात बदल केला आहे. आात या यादीत आरसीबीचाही समावेश होणार आहे.

आयपीएलच्या सतराव्या हंगामात आरसीबीचा पहिला सामना 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्सबरोबर रंगणार आहे. तर दुसरा सामना 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सबरोबर खेळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story